भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या आशिया कप 2022 स्पर्धेची तयारी करत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेनंतर कमाल फॉर्ममध्ये आला आहे. पण अशात त्याच्या खाजगी आयुष्यात काही तर खटकलंय अशा चर्चांना उधाण आलं आहे. कारण त्याची पत्नी धनश्री चहलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ‘चहल’ हे आडनाव हटवलं आहे. त्यामुळे या कपलमध्ये काही तरी खटकलं आहे अशा चर्चांना उधाण आल्याचं दिसून येत आहे.
धनश्री आणि युजवेंद्र ही जोडी सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. आयपीएल असो किंवा भारताची कोणती टूर धनश्री युजवेंद्र असणाऱ्या सामन्यांना हमखास हजेरी लावते आणि दोघांच्या अनेक सोशल मीडियाव पोस्ट व्हायरल होतात. धनश्री इतर भारतीय क्रिकेटर्ससोबतही मजेशीर तसेच डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. पण आता काही दिवसांपूर्वीच धनश्रीने इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव काढत वर्मा हे तिचं माहेरकडचं आडनाव ठेवलं आहे. त्याच दरम्यान युजवेंद्र याने देखील एक स्टोरी शेअर करत नवं आयुष्य लोडिंग अशी स्टोरी ठेवली होती. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असावं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.