मुंबई | मुंबईतल्या अभ्युदय नगरमधील भगतसिंह मैदानात मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळतेय. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि रणवीर सिंग यांनी या दांडियाला हजेरी लावून चार चाँद लावले. यावेळी सलमाननं उपस्थितांशी मराठीत संवाद साधत सर्वांची मनं जिंकून घेतली. मुंबईत भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी दांडियाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.
भाजपकडून मुंबईतील मराठी बहुल शिवडी भागात मराठी दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे. 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान दांडिया पार पडणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेही सहभागी झाला होता.