मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पहिल्यांदा पाहायला मिळालेला बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचे साक्षीदार लाखो शिवसैनिक झाले. बीकेसी मैदानावर अनेक राजकीय नेतेमंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करीत महाराष्ट्रामध्ये जमलेल्या गर्दीचा फोटो शिवतीर्थावर पाठवा म्हणजे त्यांना कळेल एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय जनतेला मान्य आहे असे जाहीर आव्हान त्यांनी केले. ठाकरेंच्या इस्टेटीचे वारसदार नसलो तरी हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आमच्या ४० आमदारांची नाव आहे. उद्धव ठाकरेंनी धनाची चोरी केली आणि आम्ही हिंदुत्वाच्या भगव्याची चोरी केली आहे. अशा अनेक मुद्यांवर गुलाबराव पाटील सभेत बोलताना दिसून आले.
मैने एक दिन का मुख्यमंत्री पिक्चर देखा वो था नायक
ये आदमी (एकनाथ शिंदे) बनेगा अभी राष्ट्रवादी ॵर काँग्रेस का खलनायक
असा चित्रपटांचा उल्लेख करत चित्रपटांची उदाहरणे आपल्या भाषणात त्यांनी घेतले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना देखील त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे. शेवटी आपल्या भाषणात त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी यांचा सत्यानाश होऊदे असा शेवट केला.