पुणे | कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या साखर आयुक्तांसहित बारामती ॲग्रो लिमिटेड कारखान्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी देखील हि मागणी मान्य केली आहे. त्यावर त्यांनी या प्रकरणाचे तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे अशी माहिती राम शिंदे यांनी दिली आहे.
इंदापूर तालुक्यामधील शेटफळगडे येथील बाराम ती ॲग्रो या कारखान्याने नियमाचे उल्लंघन केले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलेली चौकशी मला मान्य नाही. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं यासंदर्भात लक्ष वेधलं आहे, असं राम शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मी सर्व पुरावे त्यांच्याकडे सादर केले आहेत, असं ही राम शिंदेंनी म्हटलं आहे. राज्यातील यंदाचा ऊस गाळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. तरीही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो या कारखान्याने गाळीत सुरु केलेलं नाही असा आरोप ११ ऑक्टोबर रोजी राम शिंदेंनी केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत असं राम शिंदेंनी म्हटलं होतं.