रोम | इटलीमध्ये एक ठिकाण असं आहे तिथं तब्बल 1 लाख 60 हजार लोकांना जीवंत जाळण्यात आलं होतं. होय…इटलीच्या पोवेग्लिया आयलँडमध्ये (Poveglia Island) ही घटना घडली होती. त्यामुळे या ठिकाणाला ‘आयलँड ऑफ डेथ’ (Island Of Death) असेही म्हटले जात आहे. पण आता या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या आयलँडमध्ये जी काही लोकं गेली, ती परत आलीच नाहीत. त्यामुळे इथं जाण्यावर आयलँड सरकारने बंदी घातली आहे.
इटलीमध्ये अशी अनेक आयलँड आहेत ती पाहण्यासाठी 12 महिने पर्यटकांची गर्दी असते. लांबून लोक हे पाहायला येत असतात. पण इटलीतील पोवेग्लिया आयलँड हे अत्यंत भयानक असे हे ठिकाण आहे. इथं जाणाऱ्या लोकांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा सापळाच बनत आहे. त्यामुळे तिथं तुमची इच्छा असली तरी जाता येणार नाही.
इटलीच्या वेनिस आणि लिडो शहराच्या मध्यभागी असलेल्या वेनेटियन खाडी येथे अस्तित्वात आहे. हा एक टुरिस्ट पॉईंट आहे. 16 व्या शतकात जेव्हा इटलीत प्लेगची साथ आली होती. त्यावेळी अनेक लोक या आजाराने ग्रस्त होते. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला होता. त्याचा इटलीवर मोठा प्रभाव पडला होता. प्लेगची साथ मोठी होती. एकाकडून दुसऱ्याला संसर्ग होत होता. त्यामुळे इटलीच्या सरकारने प्लेगग्रस्तांना पोवेग्लिया आयलँडमध्ये नेण्याचा निर्णय घेतला होता. हेच ठिकाण क्वारंटाईन स्टेशन बनले होते. या प्लेगने मृत पावलेल्या रुग्णांना तिथेच दफनही केले जात होते. जास्तीत जास्त 40 दिवस क्वारंटाईन केले जात होते. मात्र, तरी देखील इथं ज्याला आणले जाई त्याला घरी सोडण्यात येत नसे.
1.60 लाख लोकांना जिवंत जाळले
याबाबत काही इतिहासकारांनी सांगितले की, प्लेगची साथ आणखी वाढू नये म्हणून या आयलँडवर एकत्र असे 1 लाख 60 हजार प्लेगग्रस्तांना जिवंत जाळले होते. त्यानंतर काला बुखार हा आजारही आला होता. त्यावेळी या आजारावर कोणताही उपचार नव्हता. अनेक लोक यात मरण पावले. तेव्हाही मृतदेह पोवेग्लिया आयलँड येथे आणून सोडले होते. त्यामुळे इथली परिस्थिती नरकसमानच दिसत होती. आजही या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी नाही.