अमरावती | काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर विविध राजकीय नेतेमंडळींकडून टीका केली जात होती. त्यातच आता काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप (Virendra Jagtap) यांनी सावकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण विविध प्रकारच्या विधानांवरून पेटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचे विधान असो किंवा राहुल गांधी यांचे सावरकरांबाबतचे वक्तव्य. त्यावर आता माजी आमदार वीरेंद्र जगताप भर पडली आहे. वीरेंद्र जगताप यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केले होते. त्यांनी सावरकर हे देशाला कलंक होते. नीच राजकारण करणाऱ्या सावरकरांना आम्ही कधीही स्वातंत्र्यवीर म्हणणार नाही, असे खळबळजनक विधान केले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर राज्यात वातावरण तापले होते. त्यानंतर आता काँग्रेसच्याच एका माजी आमदाराने असे वक्तव्य केल्याने येत्या दिवसांत राजकारण आणखी पेटेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.