महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागला. हा निकाल महाविकास आघाडीसाठी अत्यंत धक्कादायक ठरला तर महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. खरं तर निवडणूक कोणतीही असो एका मताला ही फार किंमत असते. या विधानसभा निवडणुकीत काही जागांवर उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले म्हणजे काहींचा अगदी निसटता विजय झाला तर काही ठिकाणी अगदी एकतर्फी लढत दिसली. अगदी मोठ्या मताधिक्यानं उमेदवार निवडून आले. अशाच सर्वाधिक आणि सर्वात कमी मताधिक्य मिळालेले आमदार कोण आहेत? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.