पुणे | सतत काहीना काही विधान करून चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आता नवं वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’, असे विधान केले आणि पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.
विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोश्यारी यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’. इतकेच नाही तर भाषण सुरू असताना राज्यपाल कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना देखील बाजूला व्हायचे आदेश दिले.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी काही विधाने करून वाद ओढवून घेतला होता. त्यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर आता राज्यपालांनी हे विधान केले आहे.