मुंबई | बिग बॉस (Bigg Boss) या शोला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर याचा 16 वा सीजन सुरु आहे. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी झालेले आहेत. त्यात दिग्दर्शक साजिद खान देखील बिग बॉसच्या घरात सध्या आहेत. तेथे असताना साजिद खानला अभिनेता सलमान खान याने एका गोष्टीवरून समजून सांगितले. मात्र, त्यांनी ऐकले नसल्याने थेट सलमान खानकडून कानउघाडणी करण्यात आली.
बिग बॉसच्या घरात सलमान खानने साजिद खानला चांगलेच सुनावले आहे. सलमान खान साजिद खानला म्हणतो, साजिद हा तर प्रोक्लेम्ड महागुरु बनला आहे. तो कोणाची इच्छा पूर्ण करू शकत नाही. आपल्या इच्छेनुसार तो लोकांकडून कामे करून घेतो. सलमान खानने साजिदला पक्षपाती म्हटले आहे. यापूर्वीही सलमान खानने साजिदचा ‘क्लास’ घेतला होता. प्रत्येकवेळी तक्रार करणे हा साजिदचा डिप्लोमॅटिक नेचर राहिला आहे, असेही सलमानने म्हटले आहे.
बिग बॉस या शोमध्ये पंजाबची कतरिना कैफ, शहनाज गिल पाहुणे कलाकार म्हणून येणार आहे. शहनाज गिल हा त्यांच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत रॅपर एमसी स्क्वेअरही असणार आहेत.