बंगळुरु | गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांतील संबंध ताणले जात आहेत. त्यावरून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा नवं विधान केले आहे. ”महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही”, असे बोम्मई म्हणाले.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीतील खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्या भेटीनंतर काहीतरी तोडगा निघेल, असे वाटत होते. मात्र, त्यावर कोणताही तोडगा न निघताच उलट बोम्मई पुन्हा बरळले आहेत. ते म्हणाले, ”महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटकचे खासदार सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहेत”.
दरम्यान, महाराष्ट्रातील शिष्टमंडळ अमित शहांना भेटले आहे. त्यानंतर आता कर्नाटकचे खासदारही शहा यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या या भेटीनंतर स्वत: मुख्यमंत्री बोम्मई देखील भेट घेतील, असे सांगितले जात आहे.