कणकवली | ”माझ्या विचारांचा सरपंच येथे आला नाही, तर मी एक रुपयाचाही निधी देणार नाही. आता याला हवं तर धमकी समजा किंवा काहीही. पण आपलं गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा”, अशी धमकी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.
आमदार राणे कणकवलीत बोलत होते. ते म्हणाले, ”जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावाचा मी विकास करेन. पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर निधी देणार नाही. सगळा निधी आता माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी”.
तसेच मी सत्तेत असणारा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत”, असेही ते म्हणाले.