मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. पण तरीही त्यांना मुक्त केले जाणार नाही. कारण या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सीबीआयने या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. यासाठी 10 दिवसांची स्थगिती या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली. न्यायालयाने हे म्हणणे ऐकून घेत या निर्णयाला स्थगिती दिली असल्याने जामीन मंजूर झाला असला तरी देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी यापूर्वीही जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, अनेकदा त्यांना जामीन नाकारण्यात आला. यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला तरी आता सीबीआयने याला स्थगिती देण्याची विनंती केली आहेा. त्यानुसार आता तुरुंगातील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे.