मुंबई | ”जेव्हा सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचाच उल्लेख का होतो?, सगळ्यांनी विचार करायला हवा. महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहे. इतरांचा का होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठे ‘दाल में कुछ काला है’, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले.
शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यावर नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केले.
दरम्यान, सगळ्यांनी विचार करायला हवा महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहे. जेव्हा सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियनचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचाच उल्लेख का होतो. इतरांचा का होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठे दाल मे कुछ काला है, असेही ते म्हणाले.