नागपूर | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ”घेतले खोके, भूखंड ओके…दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव…”, यांसारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरण्यात आले. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. ”धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो…बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे…राजीनामा द्या, राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…महापुरुषांचा अपमान करणार्या भाजप सरकारचा धिक्कार असो…भूखंडाचा श्रीखंड खाणार्या सरकारचा धिक्कार असो…”
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी, काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज आमदार आणि नेते उपस्थित होते.