मुंबई | ”केंद्र सरकारने गरिबांना रेशन देण्यासंदर्भात नवीन रेशन पॉलिसी जाहीर केली. त्यापद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचे रेशन केले आहे. मागेल त्याला एसआयटी”, अशी टीका शिवसेना (उ.बा.ठा.) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याविषयी संजय राऊत यांना माध्यमांनी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, ”गरिबांना रेशन देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन रेशन पॉलिसी जाहीर केली. त्यापद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचे रेशन केले आहे. मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात काही आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी”.
सत्तेचा गैरवापर केला जातोय
जे विषय पोलीस, सीबीआयने संपवले आहेत. त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही तौंडावर पडाल, असेही ते म्हणाले.