मुंबई | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. या पाचही जागांवर उमेदवार घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना उमेदवारी देण्यात आली.
नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार शुभांगी पाटील असतील, असे जाहीर केले.
याबाबत माहिती देताना नाना पटोले म्हणाले, ”जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.”