मुंबई | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात विरूद्ध भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) अशी सध्याची खेळी असल्याचे मी मानतो. देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा नवीन चेहरा म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे असतील, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले.
पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, ”आपण जर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पाहिली तर राधाकृष्ण की बाळासाहेब थोरात अशी परिस्थिती होईल. पण यामध्ये राष्ट्रवादीची पसंती ही बाळासाहेब थोरात यांना राहील. त्यामुळे सध्याच्या घडीला ज्यांची कसोटी लागली आहे असा जर व्यक्ती कोणी असेल तर तो राधाकृष्ण विखे पाटील हे आहेत, असे मी मानतो”.
…म्हणून मुख्यमंत्री शिंदेंची घेतली होती भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी भेट देण्याचा वेगळा भाग आहे. नोएडला डॉ. बाबासाहेबांचे प्रतिकृती तयार होत आहे. ती व्यवस्थित आहे की नाही, ती बघून घ्या. असा त्यांचा आग्रह होता. मी अंतिम केल्याशिवाय पुढं जाणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे मी त्यांची या विषयी भेट घेतली होती.
…तर आठवलेंचं दुर्दैव
डॉ. बाबासाहेबांची प्रतिकृती योग्य आहे की नाही याचं सर्टिफिकेट देण्याचा माझ्याकडे अधिकार असेल आणि रामदास आठवलेंकडे नसेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे, असेही ते म्हणाले.