मार्केट यार्ड, लक्ष्मी रस्ता व कर्वे रस्त्यावर आणखी तीन सेंटर सुरू
पुणे | लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे आयोजित केलेल्या जगातील सर्वांत मोठ्या ई-कचरा ड्राईव्हअंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांनी पहिल्या ई-कचरा कलेक्शन सेंटरचे आज वंदनाताई श्रीनाथ भिमाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष राजीव अगरवाल यांनी आपल्या घरामध्ये साठलेला ई-कचरा जसे की रिमोट, कॅलक्युलेटर, जुने मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करून नागरिकांना या सेंटरमध्ये ई-कचरा जमा करण्याचे आवाहन केले.
याबरोबरच मार्केट यार्ड, लक्ष्मी रस्ता व कर्वे रस्ता याठिकाणी आणखी तीन सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. यामुळे पुणे शहरातील ई कचरा गोळा करण्यास मोठी मदत होणार आहे.
या ई-कचरा ड्राईव्हमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. ज्यामुळे आपले घर आणि सोसायटीला आपण ई-कचरा मुक्त करू शकतो. यासाठी शाळा, सोसायटीमध्ये लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड यांच्या वतीने ई-कचरा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, गोपाळकृष्ण अगरवाल, शाम खंडेलवाल, पी.के.मेहता, विनोद अगरवाल, दीपक लोहिया, जीनु लोढा, प्रकाश ओसवाल, ज्योतीकुमार अगरवाल, हिरा अगरवाल (प्रथम महिला), सुनीता गुंदेशा आदी मान्यवर उपस्थित होते.