नागपूर | नागपूर शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आलेला असून भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झालेला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा विजय झालेला आहे.
भाजपचे उमेदवार नागो गाणार हे विजयी होतील अशी भाजपची अपेक्षा होती याच कारण म्हणजे गेल्या दोन टर्ममध्ये गाणार हे आमदार होते. परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे विजयी झालेले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.
भाजपच्याच बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. भाजप मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.