मुंबई | राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या मतमोजणीची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
“सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान केलं आहे. भाजप मध्ये त्यांना पक्षप्रवेश करण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत अशी प्रतिक्रिया दिली.