पुणे | लायन्स क्लब पुणे गणेशखिंडच्या लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्ड यांच्या तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने ताडीवाला रोड येथील तथागत ग्रुपच्या १२ गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर व्हावे या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. प्रत्येक महिलेला तिचा परिवाराला सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी मदत व्हावी म्हणून या शिलाई मशीन देण्यात आल्या.
लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डने हा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम खरोखरच गरजू महिलांसाठी उत्पनाचं साधन होईल. लाभार्थी महिलांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे मत माजी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी लायन्स रितू नाईक यांनी व्यक्त केले आहे.
नारी शक्तीला आत्मनिर्भर करण्यासाठी या शिलाई मशीन देत आहोत. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर भारत याला देखील हा उपक्रम लागू होतो असे मत प्रदेश अध्यक्ष लायन्स नीरा आनंद यांनी व्यक्त केलं.
खऱ्या गरजू महिलांना मदत झाली याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात या मशीनद्वारे महिलांना नक्कीच रोजगार मिळेल. आत्मविश्वास मिळेल आणि कदाचित यातूनच काही महिला फॅशन डिझायनर देखील होऊ शकतील. त्यामुळे जिद्दीने काम कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल असा विश्वास लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डच्या अध्यक्षा लायन्स हिरा अगरवाल यांनी व्यक्त केला.
प्रत्येक महिला या मशीनद्वारे शिवणकाम शिकून आपला व्यवसाय वाढवू शकते. त्याचबरोबर आपल्या परिवारासाठी आर्थिक मदत करू शकते. या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवला आहे, असे लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डच्या सचिव लायन्स निर्मला मित्तल यांनी सांगितले.
महिला स्वावलंबी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या महिला पुढे येतायत त्यांना प्रकल्प समन्वयक लायन्स अंबिका अगरवाल यांनी शुभेच्छा देखील दिल्या.
लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डने खूप चांगल्या पद्धतीचे काम केले आहे. त्यांनी १२ मशीन देण्याचा जो निर्णय घेतला त्यासाठी त्यांचे अभिनंदन. शिलाई मशीनमध्ये एवढी ताकद आहे की, महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना मदत करेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. मला खात्री आहे जर महिलांनी चिकाटी आणि मेहनतीने काम केले तर त्या नक्कीच एखादा छोटा-मोठा उद्योग सुरु करतील, असे मत लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष राजीव अगरवाल यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे लायन्स नीरा आनंद आणि लायन्स रितू नाईक उपस्थित होत्या. तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष राजीव अगरवाल, लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डच्या अध्यक्षा लायन्स हिरा अगरवाल, सचिव लायन्स निर्मला मित्तल, खजिनदार लायन्स अंजू टीब्रेवाल, प्रकल्प समन्वयक लायन्स अंबिका अगरवाल, नंदा ओसवाल, रुची गोयल, ममता अग्रवाल, संगीता शर्मा, सुनीता गुंदेशा, रेखा अग्रवाल, संध्या गुप्ता, शीला खंडेलवाल, श्याम खंडेलवाल, चंद्रशेखर तापड़िया ,राजेश टेकरीवाल , संजय काटकर रमेश खंडेलवाल, राजेश टिबरेवाल, माजी नगरसेविका लता राजगुरू, तथागत ग्रुपचे समन्वयक बाबा शिरोळे, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड व लायन्स लेडीज ऑक्झिलरी बोर्डचे सर्व सदस्य उपस्थित होते.