पुणे | पूना गुजराती बंधू समाज (PGBS) या पुण्यातील गुजराती समाजातील अग्रगण्य संस्थेच्या वतीने कोंढवा येथील नंदू भवनात शहरातील गुजराती समाजातील व्यक्तींसाठी रविवार १९ मार्च रोजी प्रथमच एका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सर्व गुजराती समाज बांधवाना परिवारा सह निःशुल्क प्रवेश होता. या महोत्सवाचे उदघाटन स्वामी नारायण पंथाचे त्यागानंदजी व शाश्त्रनयनजी महाराज यांच्या हस्ते व पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष नितीन भाई देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मेळाव्या मध्ये संपूर्णतः गुजरातमय वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिलांसाठी गुजराती पद्धतीची मेहंदी, टॅटू, हेअरबॅंड्स, बांगड्या इत्यादी विनामूल्य उपलब्द करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सदर महोत्सवाला भेट देणाऱ्या सर्वाना PGKM विद्याधामच्या शेजारी २ लाख चौरस फूट जागेवर पूना गुजराती बंधू समाज (PGBS) कडून उभारण्यात येत असलेल्या ‘जयराज कन्व्हेन्शन सेंटर – गुजरात भवन व स्पोर्ट्स सेंटर’ या भव्य प्रकल्पाची व त्या ठिकाणी उपलब्द होणाऱ्या सोयी सुविधा याबद्दल माहिती देण्यात आली.
दिवसभरात शहरातील सुमारे ४ ते ५ हजार गुजराती समाजातील लोकांनी या महोत्सवात उपस्थिती लावली होती. तसेच या महोत्सवात पुण्यातील विविध गुजराती समाजाच्या ४० संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे अध्यक्ष नितीन भाई देसाई, उपाध्यक्ष भरतभाई शहा, मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा, जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, खजिनदार राजेंद्र शहा व सर्व ट्रस्टी यांनी याचे आयोजन केले होते.
दरम्यान या वास्तूचे निर्माण पूर्णत्वास आले आहे. पुढील एक वर्षात त्याचे उदघाटन होईल व सभासदांसाठी वापरास सुरवात होईल अशी माहीती पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी राजेश शहा यांनी दिली.