पुणे | पुणे शहरातील प्रसिद्ध माँ आशापुरा माता मंदिराचा ध्वजारोहण कार्यक्रम विधीवत संपन्न झाला. सहा वर्षापूर्वी गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा माता मंदिर उभारण्यात आले. आशापुरा माता, महालक्ष्मी माता, अंबा माता, सच्चाई माता, पद्ममावती माता, श्री गणेश व श्री सोनाना खेतलाजी यांची मूर्ती असलेले हे अतिशय सुंदर व भव्य मंदिर आहे. आज या मंदिराचा स्थापना दिवस आहे. यानिमित्त पूजा, अभिषेक केल्यानंतर मंदिराच्या मुख्य ध्वजाची ढोल ताशाच्या गजरात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मंदिरातील पाच मातांच्या मूर्तींना उमेश राजेंद्र बोरा परिवारातर्फे चांदीचे मुकुट अर्पण करण्यात आले. याप्रसंगी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, कुटंबीय आणि शेकडो भक्तगण उपस्थित होते.
मंदिरामध्ये दरवर्षी नवरात्र उत्सव, दिवाळी पहाटसह अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंत्र, जाप, आरतीसहित भक्तांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत भक्तीमय वातावरणात या सोहळ्याचे आयोजन झाले.