नाशिक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे ते म्हणाले होते. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना असं वाटतं का, राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडायला पाहिजे, मतभेद निर्माण व्हावे? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून पहाटेचा शपथविधी आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबाबत मांडणी करण्यात आली आहे. यावरून आजच्या सामनातून राष्ट्रवादी पक्षावर राऊतांनी यांनी निशाणा साधत शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणार नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते नक्कीच आहेत, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यामध्ये बिनसल्याची शक्यता आहे.
दरम्यान या अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना जाब विचारला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक नेते आहेत. ते काम करण्यास समर्थ आहेत. या नेत्यांवर जी जबाबदारी टाकली जाईल, ती समर्थपणे पेलण्याची धमक या नेत्यांमध्ये असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा असं नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहित. मात्र संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.
दरम्यान, सध्या कर्नाटकातील निवडणुकांचा प्रचाराचा शेवट दिवस असल्याने सर्वच राष्ट्रीय नेते मैदानावर आले. तसेच कर्नाटक निवडणुकीत बजरंग दलावर बंदी घालण्यात आली. यावर बोलताना धार्मिक आणि विषारी प्रचार जर कोणी करत असतील, तर त्यांच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी झाली आहे. पण आता कोणी किती विषारी प्रचार करत आहे, हे मला माहीत नाही.