मुंबई | प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा झ्विगॅटो हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कपिलने डिलीवरी बॉयचे पात्र निभावलं आहे.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जरी कमाई केली नसली तरी मात्र हा चित्रपट चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या स्क्रिप्टने ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररी मध्ये आपले स्थान मिळवले आहे. नंदीता दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नंदिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्सचे आभार व्यक्त करत टीका देखील केली आहे.
ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचे आभार मानत नंदिता यांनी सोशल मिडियावर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात…
मला ऑस्करकडून ईमेल आला तेव्हा मला खुप आश्चर्य आणि आनंद झाला. त्यांनी त्यांच्या कायमस्वरूपी कोर-कलेक्शनमध्ये झ्विगॅटोच्या स्क्रिप्टला स्थान दिलं आहे. ही माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट आमच्यासाठी महत्वाचा होता आणि आम्ही तो बनवल्याचा देखील आम्हाला आनंद आहे. माझा विश्वास आहे की जेव्हा कथा वास्तविक असतात आणि संदर्भाशी जोडल्या जातात तेव्हा त्या संस्कृती आणि सीमा तोडतात आणि जागतिक सिनेमाचा एक भाग बनतात.
झ्विगॅटो हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले तरी सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. याबाबत नंदिताने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे नक्कीच वाचनात येत असेल अशी आशा व्यक्त केली. तसेच प्रेक्षकांना झ्विगॅटो हा चित्रपट पाहण्याची संधी दिली पाहिजे असंदेखील त्या म्हटल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Cujpo19oM89/?igshid=YTUzYTFiZDMwYg==