मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्डरिंग घोटाळा प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. मलिक हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. वैद्यकीय कारणामुळे आपल्याला जामिन मंजूर व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती परंतु, हा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दोन आठवड्यानंतर त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायमुर्ती अनुजा प्रभू यांनी हा निकाल दिला आहे. मलिक यांचे एक मूत्रपिंड निकामी झाले असून दुसरे 60 टक्केच कार्यरत आहे, अशी माहिती मलिक यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. त्यांची स्थिती आणखी बिघडत आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ते उपचार करता यावेत यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, मलिकांना अटकपुर्वीपासून किडनीचा त्रास आहे परंतु ईडीनेही यावरती आपला विरोध दर्शवत अनेक लोक आहेत जे एकाच किडनीवर जगू शकतात. मलिकांच्या मेडिकल रेपोर्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या किडनीचे साठ टक्केच प्रक्रिया सुरु असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही त्यामुळे मलिकांच्या केसमध्ये जामिन मंजूर करण्यात येऊ नये असं ईडीच्या वतीने सांगण्यात येतंय.