पुणे | दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापारमहर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी दिले जाणारे “आदर्श व्यापारी “उत्तम” या पुरस्काराचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार मे. दांडेकर आणि कंपनी, सांगलीचे अरुण दांडेकर यांना, पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार मे. कल्याण भेळ पुणेचे रमेश कोंढरे यांना, तर पुणे शहर स्तरावरील पुरस्कार मे. लोहिया जैन ग्रुप, पुणेचे पुरुषोतम लोहिया यांना प्रदान करण्यात आला.
दि पूना मर्चंटस् चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार मे. जयराज आणि कंपनी या फर्मचे संचालक राजेश शहा यांना देण्यात आला. दि पूना मर्चंटस् चेंबर सभासदांमधून प्रथमच देण्यात येणारा युवा व्यापारी पुरस्कार मे. न्यू सच्चा सौदा पेढी या फर्मचे संचालक शुभम गोयल यांना प्रदान करण्यात आला.
कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा “आदर्श पत्रकार पुरस्कार” दैनिक सकाळचे पत्रकार प्रवीण डोके यांना प्रदान करण्यात आला. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी ई कामर्स व ऑनलाइन शॉपिंगमुळे पारंपरिक व्यापारापुढे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. तसेच सरकारने व्यापाऱ्यांच्या सन्मानार्थ पुरस्कार योजना सुरु करावी आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांना ते सरकारच्या तिजोरीत भरत असलेल्या आयकराच्या प्रमाणानुसार, वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन (सम्मानधन) द्यावी, अशी मागणी केली आहे.
चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ किलोचा विक्रमी केसर राइस केक बनवणाऱ्या निकिता बाठिया यांचा इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया वर्ल्ड रेकॉर्डने दिलेले प्रमाणपत्र पीयूष गोयल यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय उत्तम बाठिया यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारका जालान यांनी केले. यावेळी जेष्ठ विधी सल्लागार अॅड. एस. के. जैन, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २चे प्रांतपाल लायन विजय भंडारी, कार्यक्रमाचे आयोजक दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, दि पूना मर्चंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले, माजी चेंबर अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र गुगले, राजेश फुलफगर, दीपक बोरा, अजित सेटिया, आशिष दुगड, दिनेश मेहता, नवीन गोयल, डॉ. देवीचंद जैन, सुर्यकांत पाठक, डॉ.बाबा आढाव, आनंद चोरडिया, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर, डॉ. विनोद शहा, भरतभाई शहा, जयंत शहा, शैलेश गुजर, राजाराम धोंडकर आदींची यावेळी विशेष उपस्थिती होती.