पुणे । पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात पुरणपोळी बनवण्याची खास पद्धत आहे. खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते.त्याला मांडे असं म्हणतात. हे वैशिष्ट्यपूर्ण खापरावरचे पुरणाचे खान्देशी मांडे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. अगदी रेशमासारखे मऊ, पातळ, तोंडात पडताच विरघळणारे हे पुरणाचे मांडे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनले आहे. पण हे मांडे बनवणे म्हणजे अत्यंत कौशल्याचे काम आहे. पुरण शिजवेेपर्यंत तर सगळे आलबेल असते. पण गंमत आहे ती मांडा थांपण्यात, लाटण्यात, तो खापरावर शेकण्यात.हेच खान्देशी मांडे कसे बनवले जाते. हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.