टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि त्याची पत्नी आमदार रिवाबा जडेजा अनेक कारणांमुळे सातत्यानं चर्चेत येत असतात. आत्ता सुद्धा जडेजा पती पत्नी चर्चेत आहेत मात्र, सध्या चर्चा रविंद्र जडेजाच्या घरातील वाद उफाळून आल्याची आहे. रविंद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजावर आरोप केले आहेत.
का वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह म्हणाले की, ‘माझा रवींद्र जाडेजा अथवा त्याच्या पत्नीसोबत कोणताही संबंध नाही. आम्ही एनक वर्षांपासून वेगळे राहतो. ते आम्हाला बोलवत नाहीत, अथवा आम्ही त्यांना बोलवत नाही. रवींद्र जाडेजाच्या लग्नानंतर दोन तीन महिन्यातच वादाला सुरुवात झाली. रिवाबाने त्याच्यावर काय जादू केली माहित नाही. माझा तर मुलगा आहे, मला खूप वाईट वाटतं. त्याचं लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. त्याला क्रिकेटर केले नसतं तर बरं झालं असतं. आम्ही या परिस्थितीमध्ये तर राहिलो नसतो, अशी खंत अनिरुद्ध सिंह यांनी व्यक्त केली. अनिरुद्ध सिंह यांनी खंत व्यक्त केल्यानंतर आता सोशल मीडियावर रविंद्र जडेजाच्या घरातील वाद चर्चेत आलाय.
वडिलांच्या आरोपावर जडेजाचं स्पष्टीकरण
रवींद्र जाडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह यांनी मुलगा आणि सूनेवर गंभीर आरोप केले. तसेच रवींद्र जाडेजासोबत राहत नसल्याचेही त्यांनी सांगितलं. त्याशिवाय रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबावर गंभीर आरोप केले. वडिलांच्या आरोपावर रवींद्र जाडेजानं स्पष्टीकरण दिलेय. सोशल मीडियावर पोस्ट करत मुलाखतीतील सर्व मुद्दे खोटे आणि चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या सोशल मीडियावर लिहू शकत नाही. माझी पत्नी आणि मला बदनाम केले जातेय, असेही जाडेजानं म्हटलेय. त्यामुळं आता वडिलांनी केलेल्या आरोपांमुळं आणि जडेजानं दिलेल्या स्पष्टीकरणामुळं जडेजा कुटुंबात सुरू असलेल्या वाद चव्हाट्यावर आला आहे.