नवी दिल्ली | गुजरातमधील सुरत शहर हे डायमंड सिटी या नावाने देशात आणि जगात ओळखलं जातं..याच शहरातील उद्योगपती गोविंद भाई ढोलकिया यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासह गुजरातमधून जे.पी. नड्डा, मयंकभाई नायक, डॉ. जशवंतसिंह सलामसिंह परमार असे एकूण चार उमेदवार तर महाराष्ट्रात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछड़े असे तीन उमेदवार देण्यात आले आहेत…परंतु पेशाने उद्योगपती असलेले गोविंद भाई ढोलकिया यांना भाजपकडून उमेदवारी देण्याचं काय कारण असावं…? याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा…
दरम्यान गुजरातमधून राज्यसभेसाठी ४ जागा रिक्त झाल्या आहेत. विधानसभेतील भाजपचं संख्याबळ पाहता निवडणूक केवळ औपचारिकता मानली जात आहे. भाजपचे हे चारही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता अधिक आहे…