देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, या 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 26 जून रोजी या चारही जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
कसा असेल विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वेळापत्रक
- 31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
- 10 जून रोजी अर्जाची छाननी
- 12 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
- 26 जून रोजी मतदान होणार
- 1 जुलै रोजी होणार मतमोजणी
लोकसभा निवडणुकीची रणधिमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील विधनपरिषदेच्या 4 जागांसाठी ही मतदानप्रक्रिया पार पडणार असल्याने सध्या राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागल्याचे पहायला मिळत आहे. वास्तविक पाहता राज्यात यंदा पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली अर्थात महाराष्ट्रात 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया संपली. त्यानंतर सर्वच राजकी.य पक्षांनी विधनपरिषदेच्या 4 जागांसाठीची तयारी करण्यास सुरुवात केली होती. आता या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर यासाठी उमेदवार कोण असणार याचीही उत्सुकता लागलीये.