देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत आहे.. त्यातील पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत.४ जून नंतर आम्ही सरकार स्थापन करु असा इंडिया आघाडीचा दावा आहे. त्याचवेळी आम्ही आताच बहुमताच्या २७२ च्या आकड्याच्या पुढे आहोत, असा भाजपाकडून दावा करण्यात येतोय. त्यामुळे निकालाच्या आधीच इंडिया आघाडी की एनडीए सरकार याची उत्सुकता वाढली आहे..या संदर्भात प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल काही अंदाज व्यक्त केले आहेत. प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक 2024 बद्दल काही अंदाज वर्तवले आहेत ? नेमकं काय गणित मांडलं आहे?महाराष्ट्राबाबत त्यांचा दावा नेमका काय आहे?…हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ…
सिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय विश्लेषणाकडे सत्ताधाऱ्यांचे समर्थक आणि विरोधक या दोघांचही लक्ष असतं. कारण प्रशांत किशोर यांच्याकडे देशातील विविध पक्षांसोबत काम करण्याचा, जनमानसाची नस ओळखण्याचा अनुभव आहे. आता लोकसभा निवडणूक २०२४ बद्दल त्यांनी काही अंदाज वर्तवले आहेत. त्यावरुन सोशल मीडियावर भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे.लोकसभा निवडणुकीआधीच भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. यावर भाजपाला ४०० पार शक्य होणार नाही. त्यांना तेवढ्या जागा मिळणार नाहीत, असं प्रशांत किशोर यांच म्हणण आहे. प्रशांत किशोर यांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींची ४०० पारची घोषणा ही कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी आहे.‘भाजपाला स्वबळावर ३७० जागा मिळणं अशक्य आहे, पण त्यांना जवळपास ३०० जागा मिळतील’ असा प्रशांत किशोर यांचा अंदाज आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्यांच्या जागा ३०३ च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतात, असा ही किशोर यांचा दावा आहे. प्रशांत किशोर हे जन सुराज पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांनी एका खासगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा अंदाज वर्तवला आहे…उत्तरप्रदेश आणि बिहार बाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे. २०१९ मध्ये यूपी आणि बिहारमध्ये मिळून भाजपाला लोकसभा निवडणुकीत २५ जागांच नुकसान झालं होतं. २०१९ मध्ये सपा आणि बसपा एकत्र लढल्यामुळे भाजपाच्या जागा ७३ वरुन ६२ वर आल्या होत्या. विरोधी पक्षाचं मत आहे की, यावेळी सुद्धा भाजपाला २० जागांवर फटका बसेल. पण त्यामुळे भाजपाला फार नुकसान होणार नाही. २०१९ मध्ये भाजपाने १८ जागा गमावल्या पण बंगालमध्ये त्यांनी आपल्या जागा वाढवल्या होत्या हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.