बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेते नितेश राणे यांना मुंबई पोलीसांनी दिशा सालियन च्या मृत्यू प्रकरणी समन्स बजावला आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी हजार राहण्यास सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा 8 जून 2020 ला मुंबईमधील मालाडच्या गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. तर, या घटनेच्या काही दिवसानंतर अभिनेता सुशांत सिंह याने देखील आत्महत्या केली होती. 8 तारखेला दिशा सालियन चा मृत्यू झाला पण, शवविच्छेदनासाठी दोन दिवसांचा विलंब का लागला आणि या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे गंभीर आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर केले होते. दिशा सालियनची आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आणि त्यांचा पाठोपाठ आमदार नितेश राणे यांनी ही केला आणि आपल्याकडे या हत्येप्रकरणी पुरावे असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले होते.
नितेश राणे काय म्हणाले?
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी जबाब देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बोलावलं आहे. मी देखील तयार आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतचा खूनच झाला असून आजही त्याचे आरोपी विधानभवनच्या परिसरामध्ये मोकाट फिरत आहेत. आदित्य ठाकरे हे 8 जून आणि १३ जून ला पार्टीमध्ये उपस्थित होते या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. आदित्य ठाकरेंचे त्यावेळचे लोकेशन तपासावे, तेव्हाचे सीसीटीव्ही देखील डिलीट करण्यात आले, 8 जून चे मस्टरचे दोन्ही पानही फाडण्यात आलेत. त्यामुळं आदित्य ठाकरेंचे 8 आणि 13 जूनचे टॉवर लोकेशन तपासले पाहिजे. हे मी आधी पासून सांगत आलोय.
त्याकाळात महाविकास आघाडीच सरकार असताना मुंबई पोलिस आयुक्तांवर खूप प्रेशर होत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मला या आधीही बोलावण्यात आलं होतं. परंतु, मी मुंबई पोलिसांना त्या संबधी सर्व पुरावे देणार आहे. आत्ता काही महत्वपूर्ण पुरावे हे मुंबई पोलिसांना भेटले आहेत. असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलय. आताच सरकार हे महायुतीच सरकार आहे. त्यामुळे,आम्ही पुण्याच्या अग्रवालला सोडलं नाही, मिहिर शाहला सोडलं नाही आणि आदित्य ठाकरेंना ही सोडणार नाही असही नितेश राणे म्हणाले.