केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 23 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध ॲपल या कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर ॲपलने हा निर्णय घेतला आहे.ॲपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या आयफोन प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. मेड इन इंडिया आयफोन 13, 14 आणि 15 च्या दरातही साधारण 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. यासह iPhone SE च्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत घट केली आहे.
आयफोनचे नवे दर खालीलप्रमाणे :
आयफोन एसई (iPhone SE) – 47600 रुपये
आयफोन13 (iPhone 13) – 59,600 रुपये
आयफोन 14 (iPhone 14) – 69,600 रुपये
आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) – 79,600 रुपये
आयफोन 15 (iPhone 15) – 79,600 रुपये
आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) – 89,600 रुपये
आईफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) – 1,29,800 रुपये
आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) – 1,54,000 रुपये