गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. तसेच सांगली, कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. अशा परिस्थितीत आज पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस बरसेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसांचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे. पण आता हवामान विभागाकडून नवीन अपडेट जारी करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होत याचा परिणाम जनजीवनावर झाला. अशा परिस्थितीत आज 1 ऑगस्ट 2024 म्हणजेच आज पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने कोकणात रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे आणि विदर्भातील चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक वेधशाळेने दिला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला सायकलोनिक सर्क्युलेशनमुळे पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.