सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये शेतकरी कामगार पक्षाचं १९वं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात राज्यभरातून अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान कार्यक्रमात स्टेजवरच अलिबाग मधील शेकापच्या पाटील कुटुंबीयांमध्ये वाद झाला. पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांच्यात हा वाद झाला…आता भर कार्यक्रमात हा वाद का झाला…? वादामागचं नेमकं कारण काय…? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
शेतकरी कामगार पक्षाचं १९वं राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये पार पडलं. या अधिवेशनात कार्यक्रमात स्टेजवरच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांच्यात वाद झाला. या वादाचं मुख्य कारण अलिबाग विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी हे आहे. पंडित पाटील यांनी जयंत पाटील यांना आव्हान दिल आहे. पक्षात तुम्ही दादागिरी करु नका, या शब्दात पंडीत पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावलं. दोन भावांमध्ये स्टेजवरच बाचाबाची झाली. उपस्थितांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं. शेकापचे जयंत पाटील हे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसताना देखील चार वेळा विधानपरिषदेवर निवडून आलेत. राज्यातील तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीत त्यांनीपडद्यामागून सूत्र हलवली आहेत. परंतु गेल्या तीन ते चार दशकांपासून पक्षाला उतरती कळा लागली आहे आणि अशातच नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळं पक्षाचं राज्यातील राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायगड मधून एकही आमदार निवडून आला नाही. आणि आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना आपल्या सुनेला चित्रलेखा पाटील यांना अलिबाग विधानसभा मतदार संघातून उमेदवारी द्यायची इच्छा आहे. परंतु अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदार संघातून विजयी झाले होते. आता त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आस्वाद पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. आता गेल्या तीन वर्षातला अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी काँग्रेसच्या मधुशंकर ठाकूर यांचा २४,१४८ मतांनी पराभव केला. तर २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांचा शेकापच्या सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी १६,०९४ मतांनी पराभव केला. २०१९च्या निवडणुकीत मात्र शेकापला पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या पंडित पाटील यांचा ३२,९२४ मतांनी पराभव केला. पण २०१९ च्या निवडणुकीत मराठवाड्यातील लोहा मतदारसंघातून शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे एकच आमदार निवडून आले.