विधानसभा निवडणुक अगदी काही महिनांवर असताना उमेदवारीच्या दावेदारीवरून राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यावर ‘उदय सामंत हे कोणाचे ही होय शकत नाहीत’ असे म्हणत निशाणा साधला. त्याचबरोबर उदय सामंत हे भाजपच्या वळचणीला जाऊन निवडणूक लढवतील असेही राजन साळवी म्हणाले.
काय म्हणाले राजन साळवी : उद्धव ठाकरेंनी उदय सामंत यांना अनेकवेळा संधी दिली. महाविकास आघाडीचे सरकार असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद दिलं त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही पद दिलं. हे होतं तोवर लगेच उद्धव ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून शिंदे गटात गेले आणि तिकडेही उद्योगमंत्रीपद घेतले आणि आता येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील. उदय सामंत हे कोणाचेही होऊ शकत नाहीत, ना ते शरद पवारांचे झाले, ना उद्धव ठाकरेंचे झाले आणि एकनाथ शिंदेंचे हि होऊ शकणार नाहीत.
परंतु, आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार हा उदय सामंतांना पराभूत करणार असे म्हणत राजन साळवी यांनी मोठा विश्वास व्यक्त केला.