लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष असं दिसतंय. दोन्हीकडं जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहे. पक्षांतंर्गत बैठका, गाठीभेटी पार पडतायत. जागावाटपामध्ये लोकसभेला जे आपण पाहिलं तसंच आता विधानसभा निवडणुकीपूर्वीही पाहायला मिळतंय. महायुतीबद्दल सांगायचं झालं तर, तीनही प्रमुख पक्ष एकाच विधानसभा जागेवर दावेदारी सांगताना दिसतायत. अशा विधानसभा मतदार संघांची संख्या मोठी आहे. त्यामुळं अनेक विधानसभा क्षेत्रात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त बनलेले हे मतदारसंघ नेमके कोणते? आणि त्याठिकाणी कोण दावा ठोकून आहे? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
आपण सुरुवातीला महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं आणि त्याच्या काय चर्चा सुरु आहेत ते पाहुयात. भाजपचे सद्यस्थितीला १०५ विद्यमान आमदार असल्याने जागावाटपात भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. प्राथमिक चर्चेनुसार, भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकतो. शिंदेंची शिवसेना १०० जागांसाठी आग्रही आहे तर अजित पवार गटाला ६० ते ७० जागा मिळू शकतात. काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय महाविकास आघाडीच्या काळातील काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागाही आम्हाला द्या, अशीही अजित पवार गटाची मागणी आहे. यासह शिंदेंची शिवसेना आणि भाजप देखील विद्यमान आमदार असेलेल्या जागा आपल्याकडेच राहाव्यात तसेच जिथं आपली ताकद तिथं आपलाच उमेदवार उभा करावा यासाठी आग्रही आहे. आता वाद होण्यासारख्या ज्या जागा आहेत त्या पाहुयात…