राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि पक्षातील राजकीय नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग व्हायला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर मधल्या कागल विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठं खिंडार पडलं. आपण सर्वांनीच ते पाहिलं. शरद पवारांनी कागल मध्ये मोठी खेळी खेळली आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समरजितसिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेतलं. समरजितसिंह घाटगे यांच्या पक्ष प्रवेशामुळं कागल मध्ये भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा फटका बसल्याचं दिसतं. आता कोल्हापुरातील ही हानी भरून काढण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे या दोघा पिता-पुत्रांना भाजपमध्ये घेतलं आहे. यामुळं इचलकरंजी मधील राजकारणाला एक वेगळंच वळणं मिळालं आहे.. आता अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे या दोघांमुळे इचलकरंजी मधील राजकीय समीकरण कसं बदलेल ? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…