नवी दिल्ली | सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सीएनजी वाहनांची खरेदी वाढली होती. पण आता इलेक्ट्रिक वाहन (Electric Scooter 9) खरेदीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात OLA आणि बजाज या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या सर्व कंपन्यानंतर बाझ (Baaz) या कंपनीने नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे.
आयआयटी दिल्ली इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी बाज या इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात जोरदार एंट्री केली आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधाही देण्यात आली आहे. या स्वॅपिंग प्लॅटफॉर्ममध्ये 9 बॅटरी फिक्स केली गेली आहे. या स्कूटरची बॅटरी अवघ्या 90 सेकंदात बदलता येऊ शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने बॅटरी स्वॅपिंग स्टेशनमधून बॅटरी बदलून नॉन-स्टॉप प्रवासाचा लाभ घेता येऊ शकतो, असे सांगितले आहे. हे स्वॅपिंग स्टेशन वेगवेगळ्या ऋतुनुसार डिझाईन केले गेले आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किमी प्रतितास स्पीडने धावू शकेल. ही स्कूटर 35 हजारांत मिळेल, अशी चर्चा आहे. असे जरी असले कंपनीने याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही.