पुणे | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक दुर्घटना घडत आहे. आत्महत्या व खुनाचे प्रकार पुण्यामध्ये वाढलेले दिसत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर एका तरूणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक वर उभी असतानाच ट्रेनचा प्रवासी असलेला 28 वर्षीय तरुणाने रेल्वेच्या डब्यांवर चढण्याचा प्रयत्न केला. गोरखपूर रेल्वेच्या डब्यांवर चढून एका तरुणाने ओव्हरहेड वायरला हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या तरूणाने 25000 व्होल्टच्या OHE ला हात लावला होता. तरुणाने वायरला हात लावताच एकच स्फोट झाला. त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लॉट होते. एवढ्या हाय व्होल्टचा झटका लागल्याने हा तरूण ७० ते ८० टक्के भाजला गेलाय. हा तरूण मुळचा ओडीशाचा आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याला ससूण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जातेय.
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेवर चढण्यापासून दोनदा अडवले. परंतु तिसऱ्यांदा हा तरूण कर्मचाऱ्यांची नजर चुकवून गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्यांवर चढला. हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावताच हा तरूण फार मोठ्या प्रमाणात भाजल्या गेला.
या थरारक घटनेनंतर रेल्वेस्थानकावर सगळीकडे खळबळ उडाली होती. तसेच ही घटना रेल्वेस्थानकावर घडल्याने रेल्वेप्रवाशांचीही मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली.