नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश उदय लळीत निवृत्त झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड (Dhananjay Y. Chandrachud) यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीला माणसाला मान मिळाला.
देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांची नेमणूक करण्यात आली आहे. १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत चंद्रचूड यांचा कार्यकाळ असणार आहे. या कालावधीत महत्वाच्या घडामोडी असणार आहे ज्यामध्ये धनंजय चंद्रचूड यांच्याच खंडपीठासमोर राज्याचे सत्तांतराचे प्रकरण असणार आहे. ज्याच्या काही सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. चंद्रचूड यांनी आधी दिलेले निर्णय ऐतिहासिक ठरले आहेत. त्याचबरोबर २०२४ मधील निवडणुका देखील याचकाळात असणार आहे. त्यामुळे चंद्रचूड यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनामध्ये द्रोपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना शपत दिली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपतविधी सोहळा पार पडला.