बाली | इंडोनेशियाची राजधानी बाली येथे दोन दिवसीय G20 शिखर परिषदेचे (G20 Summit) आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.16) या परिषदेची सांगता झाली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. ”G20 चे अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले.
भारताकडे अध्यक्षपद आल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘1 डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे G20 चे अध्यक्षपद स्वीकारेल. जगाला भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागत असताना भारत G-20 ची जबाबदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जगाला G20 कडून मोठ्या अपेक्षा आहेत. G20 चे अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.’