नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढत आहेत. यामध्ये ट्विटर, मेटा, अॅमेझॉन यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता गुगलची (Google) पॅरेंट कंपनी अल्फाबेट (Alphabet) देखील दहा हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.
मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon), ट्विटर (Twitter) आणि सेल्सफोर्स (Salesforce) सारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच आपल्या शेकडो-हजारो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. त्यात आता अल्फाबेट या कंपनीची भर पडली आहे. कंपनीकडून एकूण कर्मचाऱ्यांपैकी 6 टक्के कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. यामध्ये गुगल न्यू रॅकिंग आणि परफॉर्मन्स इप्रूव्हमेंट प्लॅन (New Ranking And Improvement Plan) अंतर्गत खराब कामगिरी करणाऱ्या अशा दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे.
सध्या अल्फाबेट कंपनीमध्ये सुमारे पावणेदोन लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. यातील 6 टक्के म्हणजे जवळपास दहा हजार कर्मचारी कपात केली जाणार आहे. पण ही कर्मचारी कपात त्यांच्या कामानुसार म्हणजे परफॉर्मन्सनुसार केली जाणार आहे.