तैपई | पगार मिळाला की प्रत्येक कर्मचाऱ्याला मोठा आनंद होत असतोच. या पगारासोबत जर बोनस मिळाला तर मग हा आनंद द्विगुणित होतो. पण अशी एक कंपनी आहे जी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक-दोन महिन्यांचा नाही तर तब्बल 50 महिन्यांचा पगार बोनस म्हणून देणार आहे. याबाबतची घोषणाच कंपनीने केली आहे.
तैवानमधील एव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशन या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या कंपनीच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, यंदाचे वर्ष 2023 तैवानच्या एव्हरग्रीन मरीन कॉर्पच्या कर्मचार्यांसाठी जबरदस्त ठरणार आहे.
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 50 महिन्यांचा पगार एकाचवेळी जमा करणार आहे. हा बोनस तैवानमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार आहे.