कार्लोसच वय वर्ष वीस, विम्बल्डनसारखी स्पर्धा आणि प्रतिस्पर्धी सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच ज्याच्या नावावर अगोदरच २३ ग्रँडस्लॅम आणि ४ विम्बल्डन आहेत. सामना सुरू होण्यापूर्वीच संपलेला वाटतोय, नाही का ?
तर नक्कीच नाही, तब्बल ४ तास आणि ४२ मिनिटे चाललेल्या या लढतीत दोघांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. पण शेवटी जोकोविचला या २० वर्षाच्या पोरासमोर हतबल होताना दिसला. पाचव्या सेटमध्ये जोकोविचचा पराभव करून त्यानं आपलं पहिलं विम्बल्डन विजेतेपद पटकावलं. टेनिस विश्वात काल आलेल्या कार्लोसने बाजी मारली, आणि इतिहास रचला.
या विजयानंतर कार्लोसने खूप सारे नवीन विक्रम आपल्या नावे केले, जसे की –
- अल्कारेझचं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं. यापूर्वी त्यानं यूएस ओपन २०२२ चं विजेतेपद पटकावलं होतं
- २०२२ मध्ये, तो राफेल नदाल आणि जोकोविचला पराभूत करणारा पहिला टीनएजर बनला होता
- अल्कारेझ हा एटीपीमध्ये (असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स) पहिल्या क्रमांकावर असलेला चौथा स्पॅनिश खेळाडू ठरला आहे. यापूर्वी नदाल, कार्लोस मोया आणि अल्कारेझचा गुरू जुआन कार्लोस फेरेरो यांनी हे मानांकन मिळवलं आहे.
- तो विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू ठरला आहे
हा सामना चांगलाच हाय वोल्टेज असा झाला. हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती यामध्ये इंग्लंडच्या राजेशाही कुटुंबाचीही उपस्थिती होती हे विशेष. सामना हरल्या नंतर जोकोव्हिचने रॅकेट तोडून आपला संताप व्यक्त केला. खरतर टेनिस विश्वात त्याची छबी याच्या विपरीत म्हणजे संयमी आणि शांत अशी आहे . यावरून त्याच्यासाठी हा सामना किती महत्वाचा होता हे कळते. ३६वर्षीय नोव्हाक जोकोविचनं ही फायनल जिंकली असती, तर त्याचे हे सलग पाचवं विम्बल्डन विजेतेपद ठरलं असतं. यामुळेच तर इकडे स्वप्न तुटले आणि तिकडे रॅकेट तोडले.
आता थोडं जाणून घेऊयात कार्लोस याच्या वयक्तिक आयुष्याबाबत आणि पाहुयात इतक्या कमी वयात त्याला इतकं मोठं यश कसं साधता आले.
अल्कारेझ हा स्पेनमधील एल पालमार या गावातील रहिवाशी आहे. त्याचा जन्म ५ मे २००३ मध्ये झाला. टेनिसचे सुरवातीचे धडे त्याला त्याच्या वडीलांकडून मिळाले. सध्या त्याचा गुरु जगातील नंबर एकचा माजी खेळाडू जुआन कार्लोस फेरेरो हा आहे. अल्कारेझ १५व्या वर्षापासूनच फेरेरोसोबत टेनिसचा सराव करत आहे.
कार्लोसने ही स्पर्धा जिंकून राफेल नादाल, जोकोव्हिच आणि फेडरर यांच्यानंतर आपलं नाव टेनिस कोर्टवर कोरायला नक्कीच सुरुवात केली आहे असं दिसते.
कार्लोस अल्कारेझनं पटकावले विम्बल्डन २०२३ चे विजेतेपद