नुकताच भारत आणि इराण या दोन देशांमध्ये चाबहार बंदरासाठी करार पार पडला. या कराराबर निर्बंध लादण्याची धमकी अमेरिकेनं दिली होती. मात्र, ही धमकी दिल्यानंतर एका दिवसानंतरच अमेरिकेती व्हाईट हाऊसमध्ये भारतीय संगीत ऐकू आलं सोबतंच व्हाऊट हाऊस मध्ये भआरतीय खाद्यपदार्थांची मेजवानीही पहायला मिळाली. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गाणं वाजल्यानं सर्व जगाच्या नजरा उंचावल्या.
आशियाई अमेरिकन नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर हेरिटेज महिना अमेरिकेत साजरा करण्यात आला. यामध्ये सारे जहाँ से अच्छा हे प्रसिद्ध भारतीय देशभक्तीपर गाणे अमेरिकन नागरिकांसमोर वाजवण्यात आले. यासोबतच या कार्यक्रमात अनेक भारतीय खाद्यपदार्थांची मेजवाणी पहायला मिळाली. यामध्ये पाणीपुरीचाही समावेश होता. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकन सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांच्यासह अनेक आशियाई अमेरिकन आणि भारतीय अमेरिकन डॉक्टर उपस्थित होते, ज्यांनी कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतापर्यंत व्हाईट हाऊसच्या फंक्शन्सच्या मेनूमध्ये फक्त समोसा दिसत होता, परंतु आता अनेक प्रसंगी मेन्यूमध्ये पाणीपुरीचाही समावेश केला जात आहे.
याबाबत बोलताना भारतीय-अमेरिकन नेते अजय जैन भुटोरिया म्हणाले की, व्हाईट हाऊसमध्ये हा एक चांगला उत्सव होता, मी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच सर्वत्र संगीतकारांनी चांगली गाणी वाजवून आमचे स्वागत केले आणि स्वागतामध्ये अनेक प्रकारच्या भारतीय पदार्थांचा समावेश होता. या कार्यक्रमातून भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंध दिसून आल्याचंही यालवेळी अजय जैन भुटोरिया यांनी सांगितले. त्यामुळं अमेरिकेनं भारताला धमकी दिल्यानंतर अगदी एका दिवसाच्या आत अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भारतीय देशभक्तीपर गाणी वाजल्यानं सगळीकडे याच गोष्टीची चर्चा सुरू आहे.