पुण्यातील पोर्शे हीट अँड रन प्रकरण चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेशातही अपघाताच्या घटनेनं हाहाकार माजवला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या गाड्यांच्या ताफ्याने तीन मुलांना चिरडल्याची घटना घडलीये. ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह उत्तर प्रदेशातील कैसरगंड लोकसभा णतदारसंघातून भआजपचे अधिकृत उमेदवार आहेत. विशेष म्हणजे ब्रिजभूषण शरण सिंह हे याच लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. आणि गेल्या वर्षभरापासून ब्रिजभूषण सिंह हे महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातून चर्चेत राहिले आहेत. आता त्यांच्या मुलाच्या गाड्यांच्या ताफ्याने तीन मुलांना चिरडल्याने पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्याचे पहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याच्या वाहनाने तीन मुलांना चिरडले आहे. त्यापैकी दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. असून तिसरा मुलगा गंभीर जखमी आहे. सध्या जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्या्चयावर उपचार सुरू असल्याची माहिती सध्या समोर आलीये. या अपघातानंतर करण भूषण सिंह घटनास्थळी न थांबल्यानेही त्यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. याप्रककरणी सध्या पोलीस एस्कॉर्ट लिहिलेली फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली आहे.
करण भूषण यांचा ताफा जिल्ह्यातील कर्नलगंज कोतवाली भागातील कर्नलगंज हुजूरपूर रस्त्यावरून हुजूरपूरकडे जात होता. दरम्यान, बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन मुलांना करण भूषण यांच्या ताफ्याच्या फॉर्च्युनर वाहनाने चिरडले. यावेळी करण भूषण यांनी ताफा तांबवून घटनेत जखमी मुलांना मदत करणे अपेक्षित होते. मात्र, करण भूषण सिंह यांनी असं केलं नाही. यानंतर मुलांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले. पोलीसही घटनास्थळी पोहोचले नंतर या प्रकरणात नागरिकांनी रास्ता रोको करून कारवाईची मागणी केली आहे.