नवी दिल्ली | जगभरात WhatsApp युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीकडूनही आपल्या युजर्सना नवनवे फिचर्स देण्यावर भर दिला जात आहे. WhatsApp ची सेवा अगदी मोफत आहे. त्यासाठी WhatsApp कडून कोणतेही चार्ज आकारले जात नाही. मात्र, आता WhatsApp कडून नवे बदल केले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला WhatsApp वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे.
WhatsApp कंपनीकडून त्यांची सर्व्हिस वापरण्यावर कोणतेही चार्ज आकारले जात नव्हते. मात्र, आता कंपनीकडून तसा विचार सुरु आहे. अद्याप सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच झाला नाही. मात्र, सध्या बिटा टेस्टर्ससाठी हे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे युजर्सला ही सर्व्हिस वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. याबाबतची माहिती WABetaInfo ने दिली आहे. यामध्ये ‘प्रोग्राम मेंबर्स प्रीमियम मेन्यू’ एक्सेस करता येऊ शकेल. तिथं अतिरिक्त फिचर्स देण्यात आले आहे.
नॉर्मल युजर्ससाठी नाही तर…
WhatsApp चे हे नवे फिचर सध्या नॉर्मल युजर्ससाठी देण्यात आले नाही. बिजनेस बीटा युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रीमियम अकाउंटमुळे युजर्सला कस्टमायजेबल काँटॅक्ट लिंकचा पर्याय मिळणार आहे.