नवी दिल्ली | एखाद्याला सविस्तर माहिती अथवा मजकूर पाठवायचा असल्यास गुगलच्या Gmail चा वापर आपण करतो. Gmail हे सर्वात जास्त वापरले जाणारे ई-मेल प्लॅटफॉर्म आहे. जेव्हा कधी आपल्याला मेल पाठवायचा असेल तेव्हा मात्र आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी गरजेची असते. मात्र, गुगलने हीच गरज ओळखून इंटरनेटशिवाय मेल पाठवण्याचे फीचर दिले आहे.
ई-मेल पाठवताना इंटरनेटची गरज असतेच. पण काहीवेळा आपल्याला मेल पाठवायचा असतो खरा तेव्हा इंटरनेट नसल्याने करता येत नाही. मात्र, इंटरनेटशिवाय मेल पाठवण्याचे फीचर गुगलने दिले आहे. गुगलचे हे फीचर फक्त Google Chrome ब्राउझर आणि सामान्य ब्राउझिंग मोडमध्ये काम करेल. हे खाजगी मोडमध्ये काम करणार नाही. तुमच्या Gmail अकाउंटवरील ऑफलाईन फीचर चालू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा अन् अनुभवा हे भन्नाट फिचर…
- Google वेबसाइट mail.google.com वर जा. तुमच्या अकाउंटला Sign In केल्यानंतर सेटिंग्ज किंवा कॉगव्हील बटणावर क्लिक करा. त्यानंतर See all setting वर क्लिक करा.
- आता ऑफलाइन बटण दाबा. हे केल्यानंतर एक पेज उघडले, पेज उघडल्यानंतर Enable Offline Mail पर्यायावर क्लिक करा.
- या सर्व स्टेप्स फॉलो केल्यावर, सेटिंग्ज सेव्ह करा. त्यानंतर Gmail तुम्हाला नवीन सेटिंग्ज दाखवण्यास सुरुवात करेल.
- हे नवीन फीचर तुम्हाला तुमच्या Gmail अकाउंटसोबत तुमचे मेल कसे सिंक करायचे याचा पर्याय देईल.
- तुम्हाला किती दिवसांचा ई-मेल पाहायचा आहे ते तुम्ही निवडू शकता. तुम्ही सर्व सिलेक्ट केल्यावर, बदल सेव्ह करा वर क्लिक करा.